Ad

Friday, 21 August 2020

कुणीतरी

कुणीतरी स्वीकारत
कुणितरी नाकारतं
यावरच सांगा आपलं
आयुष्य ठरतं?

कुणीतरी प्रेम करतं
कुणीतरी द्वेष करतं
यावरच सांगा आपलं
चारित्र्य ठरतं?

कुणीतरी शाब्बास म्हणतं
कुणीतरी हिरमोड करतं
यांवरच सांगा आपलं
ध्येय ठरतं?

कुणीतरी लाईक करतं
कुणीतरी निग्लेक्ट करतं
यावरच सांगा आपलं
लिहायचं ठरतं?

कुणीतरी पाठीशी रहातं
कुणीतरी पाठीत सुरा खुपसतं
यावरच सांगा आपलं
लढायचं ठरतं?

कुणीतरी लांब जातं
कुणीतरी जवळ येत
यावरच सांगा आपलं
जगायचं ठरतं?

" प्रशांत श शेलटकर
  8600583846
22/08/2020
6.00 a.m

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...