सुखापेक्षा सुखाच्या व्याख्याच
करतो माणूस...
प्रत्यक्षापेक्षा भासातच रमतो
किती हा माणूस...
खिडकीतूनच पाहतो तो
धो धो किती पाऊस
भिजण्याचे क्षण का
हरवतो माणूस....
दंश काट्याचे का
लक्षात ठेवतो माणूस
स्पर्श मखमली फुलांचे
का विसरतो माणूस...
का वाटते हाच
आता अंतिम श्वास ?
का उडून जावा
जागण्यावरील विश्वास?
-/प्रशांत
No comments:
Post a Comment