Ad

Saturday, 18 July 2020

उध्वस्त घरटे

मी सहज बोललो काहीतरी
फासावरच  दिले त्यांनी
कोणता केला गुन्हा
सांगितलेच नाही त्यांनी

मी जपले किती त्यांना
पर्वा न केली माझी त्यानी
चुकलो किंचित जरासा
सुळा वरच दिले  त्यांनी...

वाटले मलाच  नेहमी
की मी  त्यांचाच आहे
आताच कळले मलाही
मी परका कधीचा आहे

येईल वादळ जेव्हा
वाटले होतील पारंब्या ते
पण करण्या जमीनदोस्त
आघाडीवरच होते ते

उन्मळून पडलो जेव्हा
सोडून लगेच गेले ते..
उडून गेले केव्हाच पक्षी
उरले फक्त उध्वस्त घरटे

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...