तुझ्या असण्यापेक्षा
तुझं असणं सुखद आहे
तुझं असणं सुखद आहेच
त्याहून तुझं हसणं सुखद आहे
तुझ्या हसण्यापेक्षा
तुझं बोलणं सुखद आहे
तुझं बोलणं सुखद आहेच
त्याहून तुझं रुसणं सुखद आहे
तुझ्या रुसण्यापेक्षा
तुझं भांडण सुखद आहे
तुझं भांडण सुखद आहेच
त्याहून तुला मनवत राहणं सुखद आहे
तुला मनवण्या पेक्षा
तुला सरळ मिठीत घेणं सुखद आहे
तुझी मिठी सुखद आहेच
त्याहून मिठीची कल्पनाच सुखद आहे
तुझ्या कल्पनेत रमण्यापेक्षा
तुझं प्रत्यक्ष दिसण सुखद आहे..
तुझं दिसणं सुखद आहेच
त्याहून तुझं असणं सुखद आहे...
तुझ्या असण्यापेक्षा......
😊😊😊😊😊😊
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment