निसटून गेले...
वय भारून जाण्याचे
असे निघून चालले
की जसे फुलांना त्यांचे
सुगंध असे सोडून चालले
क्षण ते अधिरतेचे
असे निसटून गेले
त्यांना तसेच रोखण्याचे
भान निसटून गेले...
सोडुन गेले जुने मैत्र ते
नव्याने जोडणे राहून गेले
गाणे जुने विसरलो अन
नव्याने सूचणे विसरून गेले
आता साद देती
सूर आर्त भैरवीचे
सूर सुखद नांदीचे
आता पार विसरून गेलो..
किती जगावे पुन्हा नव्याने
आकडे वाढते फसवून गेले
उद्याची वाट पाहता पाहता
आज जगणे विसरून गेले
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment