Ad

Friday, 7 February 2020

बघ जग किती सुंदर

बघ जग किती सुंदर....



नियमांची चौकट
तू सोडून दे....
बघ जग किती सुंदर 💃🏽

परंपरेचे  जोखड 
फेकून दे.....
बघ किती जग सुंदर 💃🏽

बंधने फुकाची
सोडून दे.....
बघ जग किती सुंदर 💃🏽

मोकळ्या हवेत
श्वास भरुन घे....
बघ जग किती सुंदर 💃🏽

मनातलं सारं
बोलून घे.....
बघ जग किती सुंदर 💃🏽

माणस सभोतीची
तोलून घे.....
बघ जग किती सुंदर 💃🏽

मला तुझ्या डोळ्यात
पाहून घे......
बघ जग किती सुंदर 💃🏽

अन...

कुशीत माझ्या
शिरून घे.....
बघ जग किती सुंदर 💃🏽

प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...