Ad

Monday, 3 February 2020

सावर रे

बहकलो मी तरी
सावर रे म्हण ना..
घातला मी पसारा
आवर रे म्हण ना..

गुंतलो मी किती
सोड रे म्हण ना..
शब्द रुसले जर कधी
बोल रे म्हण ना..

रुसलो जर कधी
हस रे म्हण ना
बोलत सुटलो कधी तर
थांब रे म्हण ना...

हरलो जर कधी
लढ रे म्हण ना
मातलो जर कधी
सबुर रे म्हण ना

कसाही असलो मी
तू माझाच रे म्हण ना
कधीतरी डोळ्यात पाहून
मी तुझीच रे म्हण ना...

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

मग मोराने काय करावे?मग मोराचे काय करावे?

मग मोराने काय करावे? मग मोराचे काय करावे? मोर नाचतोय.. प्रेक्षकपण आहेत.. काही समोर..काही मागे.. पण समोरचे मागे आणि मागचे समोर कधीच येत नाहीत...