आता जगापासून मी
तुटत चाललो......
माझाच मला मी
गवसत चाललो....
माझ्याच अस्मितेचा
लिलाव मीच केला
प्रतिमेचाच माझ्या
बाजार मी मांडला
असा कसा लाचार
मी स्वस्त झालो....
आता जगापासून मी
तुटत चाललो......
रुपयाचा भाव मी
दमडीस का दिला?
न जाणारा तोल का
असा कसा गेला?
गोड बोलण्याला तुझ्या का
मी फसतच गेलो..
आता जगापासून मी
तुटत चाललो......
बरेच झाले जगापासून
मी तुटत चाललो...
अनुभवांची शिदोरी
मी भरत चाललो...
माझाच मला मी
गवसत चाललो...
आता माझ्या मनाचा
मीच एक स्वामी
कुणाची व्यर्थ का
मी करावी गुलामी..
लढाई व्यर्थ हरलेली..
आता जिंकीत चाललो
माझाच मला मी
आता गवसत चाललो....
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment