तू हळक्षज्ञ लिहिलंस
तरी मी तुला लाईक देणार
डिपी असो कसाही ,
मी "ऑसम"च म्हणणार
पद्धत असते म्हणून ,
तू थँक्स म्हणणार आणि
तेवढया एका कॉमेंट्सने
माझा जीव सुखावणार
मग मी तुला न चुकता
रोज gm करणार...
तू नाही केलंस तरी
मी तुला gn म्हणणार...
मग अस रोज चालणार
हजारवेळा tc म्हणणार
तुला सर्दी झाली तर
शिंका मात्र मला येणार...
मग एक दिवस तू
लय बोअर होणार
मी ऑनलाइन असलो की
तू ऑफलाईन जाणार..
तू कल्टी मारलीस तरी
मी ऑनलाइनच रहाणार
येड्या सारखा रात्रभर
मोबाईल चेक करणार....
तू जरी रेड दिलास तरी
मी त्याला ग्रीन समजणार
माझ्या मेसेजची मालगाडी
अशीच धावत राहणार....
मग एक दिवस तुझा डीपी
रंगीत संगीत होणार....
तुझ्या डीपीवर तुझा
"जानू" झळकणार....
तुझ्या "पिलू" साठी तू
खास स्टेटस ठेवणार
एव्हाना मालगाडीचे डबे
पटरीवरून उतरणार...
मग मी माझ्या स्टेटसला
फक्त सँड सॉंग ठेवणार
वुई आर जस्ट फ्रेंड म्हणून
जखमेवर तू मीठ चोळणार
पहिला ब्रेक झाल्यावर
थोडे दिवस सुतक असणार
भेटताच कुणी सुबक ठेंगणी
तिला पुन्हा gm करणार..
Show must go on ना..
😝😝😝😝😝
-प्रशांत शेलटकर
8609583846
No comments:
Post a Comment