Ad

Friday, 13 July 2018

दैना

भाट्ये ते गोळप रस्त्याची दुर्दशा पाहून सुचलेले....

😪😪😪😪😪😪

आमच्या रस्त्याची झालीया
दैना..दैना...दैना.....
आम्हाला कोणीबी वाली
नाय ना नाय ना नाय ना....

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता...
पब्लिकचा जीव झालाया सस्ता...
आमच्या जीवाची पर्वा कोणा नायना..नायना ...नायना
आमच्या रस्त्याची झालीया
दैना..दैना...दैना....

फुटा फुटावर झालंया तळ
गाडीवाल्याचा जीव तळमळ
त्या तळ्यात जीव का
बुडना बुडना बुडना...
आमच्या रस्त्याची झालीया
दैना..दैना...दैना....

दिल्या तक्रारी सतराशे साठ
पण यांची डोकी उपडा माठ
यांच्या डोसक्यात काय बी
जायना ..जायना..जायना..
आमच्या रस्त्याची झालीया
दैना..दैना...दैना....

नवी गाडी झाली खिळखिळी
आणि हाडांची वाजते चिपळी
"अच्छे दिन" कधी ते..
येईना...येईना..येईना...
आमच्या रस्त्याची झालीया
दैना..दैना...दैना....

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...