Ad

Tuesday, 10 July 2018

कसा विसरू तुला!

कधी न मिळाले
ते तूच दिले मला
कसा विसरू मी
सखे ग तुला..

तू दिलेस मला ग
आभाळ चांदण्याचे
सांग काय जबाब देऊ
आता काळोखाला..

घेतो उगाच उखाणे
खोट्या जरी सुखाचे
आता सुख का म्हणावे,
या उगाच दुःखाला

आता अनोळखी मी
माझाच मला झालो
काय नाव देऊ आता
माझ्याच काळजाला

दिसते जगाला फक्त
केवळ माझे हासणे...
झुरतो तुझ्याविना मी
सांगू कसे कुणाला...

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

कुंपणावरच्यास

कुंपणावरच्यास.... भलताच बिझी मित्रा पण स्टेटस मात्र बघतो कळते मला अरे वेड्या तू अंदाज मात्र बांधतो.. बंद करतोस दरवाजा  अन् खिडकी उघडी जराशी ...