तू जितकी नजरेआड,
तितकं मला बरं आहे...
तुला विसरण्याचा ,
हाच एक पर्याय आहे...
जर तू दिसलीस तर,
अश्रू माझे बंड करतील..
माझ्याही नकळत...
डोळ्यातून वाहू लागतील..
म्हणूनच....
तू जितकी नजरेआड,
तितकं मला बरं आहे...
तुला विसरण्याचा ,
हाच एक पर्याय आहे...
मी रडलो काय हसलो काय
तुला त्याची फिकीर नसेल...
कदाचित तुझ्या तळ हातावर
माझ्या नावाची लकीरच नसेल
म्हणूनच,
तू जितकी नजरेआड,
तितकं मला बरं आहे...
तुला विसरण्याचा ,
हाच एक पर्याय आहे...
खोटी वचने खोटा दिलासा
खोटा तुझा जिव्हाळा....
खोट्या मिठीत गुदमरला..
खोटाच तुझा उमाळा..
म्हणूनच..
तू जितकी नजरेआड,
तितकं मला बरं आहे...
तुला विसरण्याचा ,
हाच एक पर्याय आहे...
-प्रशांत शेलटकर
रत्नागिरी
No comments:
Post a Comment