"ती"
खरं सांगू मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...
एखादीच सुंदर ''असते"
बाकी फक्त सुंदर "दिसतात"
पार्लरच्या जादूने...
पोर बिचारी नक्की फसतात...
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...
लाल चुटुक ओठ अन
नैन शराबी शराबी...
फेशियल च्या किमयेन
गाल गुलाबी गुलाबी
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...
चकाकणारे सगळंच
सोनं नसतं कधी..
उन्हात चमकली तरी
'गार" हिरा नसते कधी
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...
चेहऱ्यावरचा रंग उद्या
नक्कीच उडून जाणार आहे
चेहऱ्यावर एक छानसं
स्मित मात्र उरणार आहे
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...
प्रेम तिच्यावरच कर
जी तुझ्यावर करते
आणि मेकअप शिवाय
जी तुला "ऐश्वर्या" वाटते
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...
-प्रशांत शेलटकर
रत्नागिरी
No comments:
Post a Comment