Ad

Saturday, 24 February 2018

गंपू

राजकारण झालं गजकरण
अन सोशल मीडियाच गटार
टीव्ही समोर बसलो आम्ही सोलीत ताजी ताजी मटार..

फेकू म्हणू कुणाला अन
म्हणू कोणाला पपू...
राजकारणाचे धडे देती
गल्लोगल्लीतले गंपू...
अकलेस यांच्या नसे सुमार
टीव्ही समोर बसलो आम्ही सोलीत ताजी ताजी मटार..

किराण्याची यादी करतो
हाती घेऊन कॅलक्यूलेटर....
कसे असावे  बजेट देशाचे
पेपरात लेटरवर लेटर...
लेटरांनी तुमच्या जेटली बेजार
टीव्ही समोर बसलो आम्ही सोलीत ताजी ताजी मटार..

शेतमालाला भाव हवा अन
कांदाही आम्हाला स्वस्त हवा
शिवाजी पाहिजेच आम्हाला
पण तो शेजारी जन्मायला हवा
"गांधीं" घेऊन  करु भ्रष्टाचार
टीव्ही समोर बसलो आम्ही सोलीत ताजी ताजी मटार..

डोळे वटारून मग ती विचारे
अजून कशा शिल्लक शेंगा
म्हणे गंपू मोदींनी बघ कसा
दाखवला पाकड्याना ठेंगा
तीच्या समोर झाला गंपू गार
टीव्ही समोर बसलो आम्ही सोलीत ताजी ताजी मटार..

-प्रशांत शेलटकर ©

1 comment:

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...