Ad

Friday 16 February 2018

खर सांगू मित्रा आपण आपल हसायचं असतं

खर सांगू मित्रा आपण आपल हसायचं असतं....
डोळ्यातील पाणी आपणंच  पुसायचं असतं..

सभोवतालच्या निर्जीव गर्दीत …
कुणीतरी आपल्याला शोधीत असतं
कुणीतरी फक्त आपल्यासाठीच
दोन ज्योती  लावत  असतं....
डोळ्यातल्या त्या ज्योतींसाठी
मित्रा  आपण जगायचं असतं …
डोळ्यातील पाणी आपणंच  पुसायचं असतं..

आषाढ मेघ बघ …क्षणोक्षणी  रिता होत असतो ।
पण धरणी वरच्या हिरवाईचा  तोच एक पिता असतो ।
मित्रा आपणही असंच आषाढ सारख बरसायचे असतं...
डोळ्यातील पाणी आपणंच  पुसायचं असतं..

बागेतल्या कोपऱ्यात तो अन ती बिलगून असतात …
स्वप्नांच्या धाग्यांनी भविष्य काळ विणत असतात...
अशा वेळी मित्रा त्यांना अगदी एकट सोडायचं असत
डोळ्यातील पाणी आपणंच  पुसायचं असतं..

खर सांगू मित्रा आपण आपल हसायचं असतं....
डोळ्यातील पाणी आपणंच  पुसायचं असतं..

                                                --प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...