....आपण जे सतत बघतो ,वाचतो आणि पहातो तेच सोशल मीडिया आपल्याला दाखवतो याचे कारण अल्गोरिदम ..हे बरोबरच..त्यामुळेच आजूबाजूला केवळ निगेटीव्ह चाललेल आहे किंवा आजूबाजूला केवळ पॉझिटिव्ह चाललं आहे, अमूक-ढमूक राजकीय नेता आपला तारणहार आहे/खलनायक आहे. हे आपले आहेत .ते परके आहेत अशी विचारसरणी पक्की होत जातेय.
आपल्या मोबाईलचे नेट चालू असेल आणि आपण सोशल मीडियावर नसलो तरी आपण ज्या गप्पा मारतो त्या नुसार आपल्याला नोटिफिकेशन्स येत असतात.
प्रिंट मीडिया हा राजकीय पक्षांनी वाटून घेतला आहे. एवढंच कशाला लेखक आणि विचारवंतांचे देखील कळप असतात..ते सतत ब्रेनवॉश करत असतात.
सोशल मीडिया हे समूह नियंत्रित एक टूल आहे .तुम्ही काय विचार करायचा ,कोणत्या पद्धतीने विचार करायचा ?तुम्ही काय पहायचे? एवढंच नाही आम्ही दाखवतो तेच सत्य कसे आहे..हे सोशल मीडिया ठरवतो
आपण व्हाटसप, फेसबुक ,इन्स्टाग्राम वापरत नसून आपल्याला हे सोशल प्लॅटफॉर्म वापरत आहेत हे शहाण्या माणसांनी पाहिले पाहिजे..अस मला वाटत..
-टीप- आणि हे सर्व लिहायला मला फेसबुक किंवा व्हाटसप चाच प्लॅटफॉर्म वापरायला लागतोय..हाच मोठा विरोधाभास होय
No comments:
Post a Comment