Ad

Wednesday, 3 July 2024

कविता..

कोणी न केले कौतुक
तरी निराश जराही न व्हावे
"अमुकतमुककार" म्हणुनी
तरी स्वतःलाच मिरवावे

जमवावे सभोवती मंदबुद्धी
उरूस करावा साजरा..
झगझगीत इव्हेंट करुनी
झेलाव्या कौतुक नजरा

त्याच वेदना तेच रडगाणे
त्याच त्याच सुरात गावे
धाय मोकलून रडतील असे
रसिक खास जमवावे

पदवी द्यावी लोकांनी
ते दिवस आता सरले
सत्कार करवून घेण्याचे
हे दिवस आता आले

छन्दा मध्ये न जमले
तर शब्द द्यावे विखरून
मुक्तछंद म्हणोनी त्यास
नाव द्यावे ठोकोनी

अज्ञ लोक करती इथे
अज्ञांचाच सत्कार..
अज्ञ वाजविती टाळ्या
अज्ञच करती चित्कार

हिरे म्हणून खपतात
इथे दगड धोंडे
ध्वजाचा पत्ताच नाही
उगाच मिरविती दांडे

कविता खरे तर
देवघरचेच देणे..
कुठेही कसेही नसते
उमलून येत असते  गाणे

-प्रशांत

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...