एकतर्फी....
प्रेम हे एकतर्फीच असतं..
कोणी तरी एक जण ड्रायव्हर
दुसरा फक्त प्रवासी असतो....
प्रेम हे एकतर्फीच असतं..
एक अगदी बेफिकीर
दुसरा अगदी पझेसिव्ह असतो
प्रेम हे एकतर्फीच असतं
एक जण करतो नखरे
दुसरा मात्र रडत बसतो..
प्रेम हे एकतर्फीच असतं
एकाची उगाच घालमेल
दुसरा मात्र बिनधास्त असतो..
प्रेम हे एकतर्फीच असतं
एकाचीच भरते डायरी
दुसऱ्याच पान कोर असतं
प्रेम हे एकतर्फीच असतं
अलीकडे असतो वसंत
पलीकडे थंड शिशिर असतो
@ प्रशांत
No comments:
Post a Comment