Ad

Tuesday, 1 August 2023

हत वीर्य

हतवीर्य...

हत्ती आहे एकच
आंधळे झाले हजार
वर्णन ऐकून बिचारा
हत्ती झाला पसार

उजव्यांना दिसतो पाय
डाव्यांना दिसतो कान
आपलेच खरे करताना
कोणालाच नसते भान

खांबासारखा आहे हत्ती
उजवे आपले ठाम
हत्ती आहे सुपासारखा
डावे भांडती जाम

सगळेच इकडे आंधळे
तरी दुसऱ्यांना म्हणती अंध
निरर्थकच तो वाद असतो
कोंबडी आधी की अंड ?

पिसाटलेले विचारवंत
द्वेषाचा करती जागर
भरेल का सांगा पाण्याने
केली उलटी जर का घागर?

वाईटाला म्हणा वाईट
चांगल्याला म्हणा चांगले
चांगले वाईट ठरवताना
कशाला जातीचे दाखले?

काय सत्य काय असत्य
ठरवतो हल्ली मिडिया
ट्विटर वर टिव टिव करते
ज्याची त्याची चिडीया

हतवीर्य इथे अनेक अर्जुन
शत्रू कोण ते कळेच ना
प्रत्येकाची गीता वेगळी
सत्य काय ते उमजेच ना...

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...