© pr@shant
उंच उंच झोका...
अनावृत्त मी अनावृत्त तू
अनावृत्तही या देह भावना..
सुखावून मी जातो किती!
जरी क्षणिक या कल्पना
असंख्य असंख्य चुंबने तरी
अतृप्त अतर्क्य या वासना
देह भिडता देहास तुझ्या
झंकारते ग ही देह वीणा
श्वास आणि निश्वास तुझे
चेतविती हे अंग अंग
मिठीत तुज कवळता
होतो अवघाची एक रंग
जुगलबंदी दोघांची जरी
तरी एक ही लयकारी
देहांच्या दीडदा दीडदा
वाजती अलवार सतारी
लोभस तुझ्या हरकती
घेतेस काही खास जागा
एवढ्यात नको ग समेवर
जुळवू एकेक निवांत धागा
नको विलगू ग जराही
श्वास श्वासात विरघळू दे
ओठांवरचे चंद्र चांदणे
ओठांत या जरा निथळू दे
या आपल्या खास क्षणांना
फुलपाखराचे पंख लाभूदे
अन सुखाचा उन्मादी झोका
उंच उंच अन उंच जाऊदे
- © प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment