Ad

Tuesday, 12 July 2022

सब माया है

सब माया है...

अब्जावधी माणसांचे मेंदु मध्ये एकच सॉफ्टवेअर चालत असते म्हणून जे दिसते, जे ऐकू येते तेच सत्य वाटते... कदाचित जग वेगळे असू शकेल. प्राण्यांच्या नजरेने जग वेगळे असू शकेल. अस म्हणतात निळा रंग माणसाला सर्वात शेवटी जाणवला. म्हणून त्याचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात नाही...
     असो खरे खोटे ईश्वर जाणे..आपण सगळे जिवंत आहोत म्हणजे काय आहे? आपल्या मेंदूद्वारे झालेले ते सार्वत्रिक आकलन आहे.विज्ञान पण गृहीत तत्वावर चालते. जग हे सत्य आहे हे त्यापैकी एक गृहीत. 
     निसर्गाने माणसाला आकलनाच्या मर्यादा दिल्या ते किती चांगले केले ना? विचार करा ठराविक डेसीबीलच्या  मर्यादेपलीकडे माणूस आवाज ऐकू शकत नाही ,त्याची महत्तम आणि लघुत्तम मर्यादा ठरलेली आहे.ती तशीच का ठरली? दृष्टीची पण एक मर्यादा आहे, ती नसती तर ताकातले सूक्ष्म जीव साध्या डोळ्यांनी दिसले असते, हातावर बसलेले शेकडो जीव दिसले असते, एवढेच काय चेहरा कितीही सुंदर असला तरीही त्यावर वास करत असलेले सूक्ष्म जीव दिसले असते..कल्पना करा अज्ञानात आणि मर्यादेत किती आनंद आहे.
     उत्क्रांतीच्या झांगडगुत्त्यात निसर्गाने माणसाचे पंख अशा प्रकारे छाटले म्हणून माणूस आज टिकून राहिला.स्वतःला चिकित्सक आणि बुद्धिवादी समजणारा माणूस त्याला दिलेल्या मर्यादित मेंदूच्या बळावर वेगवेगळे दावे करत असतो आणि त्याच मेंदूच्या मर्यादित बळावर सिद्ध करत असतो. पण विश्वाचे परिपुर्ण आकलनच माणसाला शक्य नाही. कारण जे दिसते ,जाणवते त्या पेक्षा ते काहितरी भलतेच असण्याची शक्यता आहे.

-प्रशांत शेलटकर
 8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...