दिलेलं दान कळावच...
असा एक वाक्प्रचार आहे की उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला कळता नये.. जेव्हा आत्मिक समाधानासाठी दान केलं जातं तेव्हा ते कोणालाही कळू नये हे बरोबर... पण जेव्हा सार्वजनिक स्तरावर मदत केली जाते तेव्हा ती इतरांना कळली पाहिजे कारण त्यातून इतरांना प्रेरणा मिळून मदतीचा ओघ वाढतो..
दान आणि मदत यात फरक आहे. माझ्याकडील जास्त मी दुसऱ्याला देतो तेव्हा ते दान होते . मदत ही कर्तव्य भावनेने केली जाते. दान गुप्त असावे कारण दानाचा अहंकार होऊ नये
मदत करताना पण अहंकार असू नये..देणारा मग्रृर असू नये आणि घेणारा लाचार..मदत देताना आपण समाजाचे कर्ज फेडत आहोत अशी भावना असावी...
सर्वांनीच आपल्या पुरत पाहिलं असत तर शाळा ,कॉलेज ,हॉस्पिटल उभी राहिली नसती. मी जन्माला आलो एकट्याने प्रगती केली असे काहीही नसते.. सर्वांचाच कळत नकळत हात भार आपल्याला लागलेला असतो.
मदत अगर दान हे पुण्य मिळावे म्हणून करायचे नसतेच. ज्याच त्याला देणं असत बस्स...
-प्रशांत
No comments:
Post a Comment