कायच्या काय...☺️
तुझ्या माझ्या नात्याला नाव काय
तुझ्याविना आयुष्याला अर्थ काय
विसरता येतच नाही तुला कधीच
यालाच लोक प्रेम म्हणतात काय?
💓💓💓💓💓💓💓💓
बावनकशी सोन्याचा भाव काय
पारखी अस कधी विचारतो काय
चमकतो हिरा कसाही अन कुठेही
खजिन्यात काय कचऱ्यात काय
💓💓💓💓💓💓💓💓
तू मला अवचित भेटतेस काय
भेटल्यावर लाजून बोलतेस काय
कितीही वेळ बोललो तरीही
बोल ना अजून म्हणतेस काय
💓💓💓💓💓💓💓💓
बटा तुझ्या गालावर येतात काय
कानामागे त्याना खोचतेस काय
धडधड उरात खळबळ काळजात
रोखून डोळ्यात बघतेस काय
💓💓💓💓💓💓💓💓
येते येते म्हणून थांबतेस काय
निघताना पाऊल अडते काय
निरोप देताना ग त्याच वळणावर
पुन्हा मागे वळून पाहतेस काय.
💓💓💓💓💓💓💓💓
एकांतात मी तुला आठवतो काय
अवचित डोळे भरून येतात काय
आणि साखर झोपेत कधी कधी
ओठावर माझे नाव येते काय
💓💓💓💓💓💓💓💓
मनात तुझ्या नेमकं चाललंय काय
कानात अलगद सांगशील काय
लाजत असशील जर सांगायला
डोळे तुझे अलवार बोलतील काय
💓💓💓💓💓💓💓💓
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment