रुटीन थोडं चेंज व्हावं...
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
लाईट जावा
काळोख व्हावा
कंदिलाच्या उजेडात
मस्त जेवणाचा बेत व्हावा
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
विहिरीचं पाणी शेंदाव
पाथरीवर धुणं धुवावं
मिक्सरवशिवाय पाट्यावरती
वरवंट्याने वाटप वाटावं
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
सिरीयलना द्यावी सुट्टी
अन काळोखात पाहत बसावं
काजव्यांची वेलबुट्टी
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
पंख्या शिवाय झोप येते का?
तेही पहावं...
अंगणात किंवा गच्चीत
तारे मोजता येतात का?
तेही पहावं
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
नेटवर्कच्या बाहेर जावं
आपल्याच रेंज मध्ये
आपणच यावं...
गॅझेटशिवाय थोडं
जगून तरी पहावं
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
किचकट आणि कठीण
जगण्यापेक्षा
साधं आणि सोपं
जगून पहावं..
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
कधी तरी अस व्हावं
रुटीन थोडं चेंज व्हावं
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment