Ad

Wednesday, 14 April 2021

लग्न

लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमात पडून मग लग्न करणे
आणि अरेंज मॅरेज म्हणजे लग्न करून मग प्रेमात पडणे.
लव्ह मॅरेज मध्ये आधी ओळख होते मग प्रेमात पडण होत ..मग सगळे योग जुळून आले तर लग्न होत.
अरेंज मॅरेज मध्ये आधी लग्न होत,मग ओळख होत जाते मग प्रेम फुलत जातं.
लव्ह मॅरेज म्हणजे वेरूळच कैलास लेणे आधी कळस मग पाया..अरेंज मध्ये आधी पाया मग प्रेमाचा कळस..
लग्न कोणत्याही पद्धतीचे असो ते लोणच्यासारख असत..जसे मुरत जाईल तसे त्यातली लज्जत वाढत जाते.
    केवळ व्यवहार बघून केलेली लग्न टिकत नाहीत आणि केवळ आंधळेपणाने केलेली लग्नही टिकत नाहीत
खरं तर वैवाहिक जीवन परिपूर्ण असूच नये..त्यात कुठेतरी अपुरेपणा असावाच.हाच अपुरेपणा एकमेकांना धरून ठेवतो. दोघेही एकमेकांवर अवलंबून असायला हवेतच.. जिगसॉच्या तुकड्यांना परिपूर्ण आकार असते तर त्याला काही अर्थच नसतो..दोन्ही तुकडे एकमेकांशी फटकूनच वागणार पण तेच जर वेडेवाकडे असले तर कुठेतरी ते एकमेकांशी जुळणारच..एकमेकांना धरून राहणारच..
     -प्रशांत शेलटकर
      8600583846
     
    

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...