इथे येणार नाही कुणी मास्तर
पाठीवर हात ठेवायला
आणि फक्त तू लढ
अस सांगायला....
तुझं तुलाच लढावं लागेल
निदान प्रतिकारासाठी...
इथे कुणी घालणार नाही
पायघड्या फुलांच्या तुझ्यासाठी
तुझं तुला चालावच लागेल
काट्यातून आणि काचातुनही
निदान तुझं तुझ्यासाठी....
इथे कोण बोलणार नाही
कौतुकाचे चार शब्द तुझ्यासाठी
उपहास झेलावेच लागतील..
अपमान आणि निंदाही...
निदान वास्तव समजण्यासाठी
इथे कुणीही बोलणार नाही
प्रेमाचे चार शब्द तुझ्यासाठी
लव्ह यू म्हणावं लागेल स्वतः लाच
कधी कघी स्वतः साठी...
निदान प्रेम अनुभवण्यासाठी
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846