प्रेम जन्मते तेव्हा सुंदर
ओल्या कातर हळव्या जखमा
त्यावर तुझी हळुवार फुंकर...
काळीज होई हलके हलके
प्रेम जन्मते तेव्हा सुंदर....
कधी येते हसू अवखळ
कधी गाली आसू ओघळ
हरवून जातो जीव बावरा
प्रेम जन्मते तेव्हा सुंदर....
जीव गुंततो असा तुझ्यावर
जसा चकोर भुले चंद्रावर
गुंतून पडतो जेव्हा भ्रमर
प्रेम जन्मते तेव्हा सुंदर....
जेव्हा एकांती बोलते नजर
दाटून येतो कंठ अनावर..
तू बोलतेस जेव्हा डोळ्यातून
प्रेम जन्मते तेव्हा सुंदर....
कधी येते हसू अवखळ
कधी गाली आसू ओघळ
हरवून जातो जीव बावरा
प्रेम जन्मते तेव्हा सुंदर....
जीव गुंततो असा तुझ्यावर
जसा चकोर भुले चंद्रावर
गुंतून पडतो जेव्हा भ्रमर
प्रेम जन्मते तेव्हा सुंदर....
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment