पाऊस थेंब...
आभाळ वेडं बरसतंय,
कृष्ण मेघ दाटले नभी
ये अशी अंगणात ग,
तू का अशी उंबऱ्यात उभी?
ये अशी अंगणात ग...
भिजू दे तुझी कोमल काया
तुझ्या विना पाऊस म्हणजे,
व्यर्थ केवळ पाणी वाया..
चिंब होऊ देत गाल तुझे...
पाऊसनक्षी..केसांवरती
पाऊस गाणे ताल धरते,
झिम्माड तुझ्या ओठांवरती
पाऊस तुझा पाऊस माझा
पाऊस आपल्या दोघांचा..
तुझ्या मिठीत धुंद झाला,
ऋतू हिरवा पावसाचा..
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment