Ad

Saturday, 9 February 2019

जेव्हा तू डीपी बदलतेस

जेव्हा जेव्हा तू
डीपी बदलतेस
तेव्हा तेव्हा तू,
तुझ्या डीपीवरून...
तू उलगडत जातेस...

चेहऱ्यावर चार उसन्या
हास्यरेषा ठेऊन उगाचच
काढतेस तू डीपी चटकन
तेव्हा तू अधिकच ,
केविलवाणी दिसतेस..
कारण वाटत राहतं
प्रश्नाच्या एका टीचकीने
फुटेल तुझ्या डोळ्यात
साठलेली अश्रूंची घागर..
म्हणून मी तुला,
विचारत नाही,
कशी आहेस तू?
जेव्हा जेव्हा तू अस
खोटं खोटं हसतेस
तेव्हा तेव्हा तू,
तुझ्या डीपीवरून...
तू उलगडत जातेस...

कधी कधी वाटतं तुला
मिटून घ्यावं स्वतःला
लाजरीच्या पानासारखं..
तेव्हा तुझा डीपी असतो,
एखादं गुलाबाचं फुल
नाहीतर गोजिरवाण मुल
जेव्हा जेव्हा तू अशी
मिटत जातेस
तेव्हा तेव्हा तू,
तुझ्या डीपीवरून
उलगडत जातेस

कधी कधी तुला,
शंका येते आपल्या मैत्रीचीच
मग तू अगदी
सेफमोडवर जातेस आणि
नवऱ्यासोबतचा तुझा फोटो
डीपी म्हणून ठेवून देतेस...
जेव्हा जेव्हा तू असा
बुद्धिबळाचा डाव खेळतेस
तेव्हा तेव्हा तू
तुझ्या डीपीवरून...
तू उलगडत जातेस...

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...