Ad

Monday, 30 July 2018

कधी कधी बरे असते

कधी कधी बरे असते
फक्त फक्त शून्य असणे....
उण्याची भीती अन
बेरजेची आस नसणे...

स्तुतीने ना कधी सुखावणे
अन टीकेची पर्वा करणे...
पथ काटेरी  वा हिरवळीचा
फक्त अन फक्त चालणे...
कधी कधी बरे असते
फक्त फक्त  शून्य असणे....
उण्याची भीती अन
बेरजेची आस नसणे...

सोबतीला असो काफ़िला
असो एकटेच चालणे..
चालणे कित्येक मैल जरी
स्वप्न एका पावलाचेच पाहणे
कधी कधी बरे असते
फक्त शून्य असणे....
उण्याची भीती अन
बेरजेची आस नसणे...

हे रोजचेच आहे आता
दशदिशांचे फितूर होणे..
अन गायब होत आहे..
चंद्राचेच चांदणे ...
म्हणूनच...
कधी कधी बरे असते
फक्त शून्य असणे....
उण्याची भीती अन
बेरजेची आस नसणे...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846
  रत्नागिरी

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...