Ad

Tuesday 17 July 2018

प्रेम नको देऊस मला

प्रेम नको देऊस मला
जमलं तर  अश्रू दे मला..
तुझ्या पापण्यांना ते पेलवणार नाहीत...

प्रेम नको देऊस मला...
जमलं तर अशी नजर दे
की ज्या नजरेतून मी
कधीच उतरणार नाही...

प्रेम नको देऊस मला
पण अशी साद राखून ठेव
कोणचं नसेल तुझ्याजवळ
तेव्हा देता येईल तुला...

प्रेम  नको देऊस मला,
पण अशी आठवण देऊन जा
की फसलेल्या मैफिलीची
भैरवी तरी यादगार व्हावी

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

मनातलं-#४

मनातलं -# -4 स्वसंवेद्य.. सखोल विचार केला तर आपण जिवंत आहोत म्हणजे मानवी मेंदूच्या मर्यादेत राहून केलेले आकलन आहे. सगळ्या जीवंत माणसांनी जिव...