Ad

Wednesday 4 July 2018

सर

सर वळवाची...
मैत्रीण खरी असते
जी तप्त जीवनात तुमच्या
बरसात सुखाची करते...

सर आषाढाची...
जी मूकपणे बरसतें...
जणू आईच्या प्रेमाची
आठवण करून देते...

सर श्रावणाची....
कसले कौतुक तिचे..
हिरवाई असताना फक्त
जी नटून सजून येते....

आयुष्याचा ऋतू....
असा समजून घ्यावा...
सरस कोणती सर...
अर्थ जाणून घ्यावा..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

कविता..

कोणी न केले कौतुक तरी निराश जराही न व्हावे "अमुकतमुककार" म्हणुनी तरी स्वतःलाच मिरवावे जमवावे सभोवती मंदबुद्धी उरूस करावा साजरा.. झ...