Ad

Monday, 2 August 2021

अनोळखी

अनोळखी

मी काहीही बोललो तरी
 रुजला अनर्थ तिथे होता
समजून घ्यावे मला कोणी
हा समजच  व्यर्थ होता

वाटले मला की
चंद्र माझ्या कुशीत आला
कळले फारच उशिरा
हा समजच  व्यर्थ होता

मी आलो तुझ्याकडे
बेफाम ओढ अशी तुझी
ओढ  तुलाही आहे
हा समजच  व्यर्थ होता

कित्येक सुखाच्या आहुत्या
 प्रेमयज्ञी अर्पित झाल्या
तू ही असशील समर्पित
हा समजच  व्यर्थ होता

मी दिले गुलाब तुला
तुझी तक्रार काटयांची
कधी तरी तुला कळेल गंध
हा समजच  व्यर्थ होता

रडलो  आतून  मी जरी
तुला हसताना दिसलो
हे आतले समजेल तुला
हा समजच  व्यर्थ होता

आता अनोळखी होणे
मजला भाग आहे.
भेटल्यावर म्हणू नको 
कोणी ओळखीचा होता

-प्रशांत शेलटकर
 8600583846
03/08/2021

😔😔

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...