निरोप
आवरून स्वप्नांना
मी एकटाच निघालो...
काळजात एक ओली
जखम घेऊन चाललो...
उत्तरे तुझ्या प्रश्नांची
ठाउक ना सखे तुलाही ?
मग उत्तरे त्याच प्रश्नांची
शोधीत मी चाललो...
जे जळ मज वाटले
ते मृगजळच बघ निघाले
मी तसाच तहानलेला
मार्गस्थ पुढे झालो....
कसल्या चुका अन गुन्हे
मज कधी न काही कळले...
शिक्षा न जाणो कशाची
मी उगा भोगीत चाललो...
दिलेस चांदणे चार क्षणांचे
मी भाग्यवंत झालो..
देऊनी दुवा तुला सखे
मी पुन्हा उन्हात चाललो..
-प्रशांत शेलटकर
8600583846