Ad

Tuesday 21 September 2021

फिडर फॉलटी हाय

संगमेश्वरी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न...जमला नाहीये तितका..
☺️☺️☺️☺️☺️☺️
---------------------

फिडर फॉल्टी हाय ...

ताsss मी काय सांगत होतंय. मंगलवारी मी कामावरून आलंय. ता जल्ला सगळा भावकीतला लायट गेलेला... भसकन खिशातना मोबाईल काडलंय..आणि मयाचो मेसेज वाचलंय..
" पावस फिडर फॉलटी ..लाईट यायला वेळ लागेल"  ह्यो मया भावकीतलो पोर..लय गुनाचो हाय..लायट गेली की तो ग्रुपावर मेसेज टाकता... ता एक बरा असता वो...निदान कलता तरी खय माती खाल्ल्यानं एमेशिबिन...काय संमजलाव...
    न्हायतर हिकडं फोन लाव तिकडं फोन लाव...सगले झो सातव्या आसमानात
      ताsss घरी आलू.. सगला जल्ला कालुक...बायकोनं वट्यावर मेनबत्ती लावलेली..आनी ती चपाते लाटत व्हती..लाडाचो लेक कोचावर तंगडे पसरून पबजी खेलत होतो..आये आणि बाबा नुसते खुरचेत बसून..
      " अगे फिडर गेलोय ..मयाचो मेसेज वाचलंय...एवडा मी बोलतंय तेवड्यात भसकन लायट आलो..मी झो गपकन मोरयेत गेलंय.. बादलेत पानी काढून ता भरता कदी ता बगीत  -हायलय..झो लायट परत जायची..
बादली भरली ..आणि झो लायट परत गेली ..जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा..
     धुमसतच चार तांबये अंगावर टाकले..आणि झो साबन रापित बसलय...खय गावना कूट...परत एकदा....जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा.....मग कसोबसो एक  गावलो...वायच वास जरा येगला वाटला..जल्ला सगल्या अंगास फासलय..तोंडाला लावनार तेवडयात भसकन मोरीतलो गुलोप पेटलो..हातातलो साबन बघितलो तर भांडी घासायचो विम बार.. जल्ला मेला करपटला कालीज ता ...वास  वायच बरा वाटला म्हणून झो सगल्या अंगास जोर काडून फासलेला ..तेवड्या साबनात लग्नाचे चार टॉप घासून झाले असते...
      ...भायर आलो..बायकोनं जेवायस वाडलेला..येव तशी मी नांदायला ....लागली व्हती..बगीत  बगीत जेवत व्हतो..झो तिकडं ओमचा आणि शिटूचा फिडर गेलेला आनी हित परत एमेशिबीचा फिडर गेला...परत येकदा.....जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा.....
       ताsss इचार केलंय आणि संतोस ला फोन लावलय..ह्यो संतोस पन भावकीतलो..एमेशिबित सायब हाय...
म्हतला  संतोस वायच जरा ही फिडरची  भानगड काय हाय रे..
त्यान बिचाऱ्यान सगला ईस्कटून सांगितलान...झो सगला डोक्यावरना गेला ..एवडाच कल्ला की फिडर गेला की लायट जाता...काय समजलाव.. 
       झोपताना परत भसकन लायट आली.. म्हतलं आता वायच सुकान झोप काडू... पन वलकटी वर आंग टेकला आनी झो..परत ..जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा.....
        रातभर डाशी मारत बसलय..सकाली बायको म्हनाली , अवो बुधवार हाय त्या मयाकडे जावा आणि चार कवटा घेवन या..मी झो उटलय आनी मयाकडे गेलंय.. ताsss मया दारातच दात घाशीत हुबा..म्हतला,मया चार कवटा दी.. तर म्हनतो कोंबडीन काल कवटाच घातल्यान नाय
म्हतल का रे बाबा..
तर म्हनतो फिडर गेला व्हता ना...
परत एकदा ..जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा..
..
.
येताना इचार करत व्हतंय... फिडरचो आनि कोंबडीचो झो काय संबंद... कोंबड्याचो फिडर गेलो की एमिशीबिचो????

  झो मेंदूचा कवाट झालाय..

🤪🤪🤪🤪🤪🤪

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...