Ad

Tuesday 21 September 2021

फिडर फॉलटी हाय

संगमेश्वरी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न...जमला नाहीये तितका..
☺️☺️☺️☺️☺️☺️
---------------------

फिडर फॉल्टी हाय ...

ताsss मी काय सांगत होतंय. मंगलवारी मी कामावरून आलंय. ता जल्ला सगळा भावकीतला लायट गेलेला... भसकन खिशातना मोबाईल काडलंय..आणि मयाचो मेसेज वाचलंय..
" पावस फिडर फॉलटी ..लाईट यायला वेळ लागेल"  ह्यो मया भावकीतलो पोर..लय गुनाचो हाय..लायट गेली की तो ग्रुपावर मेसेज टाकता... ता एक बरा असता वो...निदान कलता तरी खय माती खाल्ल्यानं एमेशिबिन...काय संमजलाव...
    न्हायतर हिकडं फोन लाव तिकडं फोन लाव...सगले झो सातव्या आसमानात
      ताsss घरी आलू.. सगला जल्ला कालुक...बायकोनं वट्यावर मेनबत्ती लावलेली..आनी ती चपाते लाटत व्हती..लाडाचो लेक कोचावर तंगडे पसरून पबजी खेलत होतो..आये आणि बाबा नुसते खुरचेत बसून..
      " अगे फिडर गेलोय ..मयाचो मेसेज वाचलंय...एवडा मी बोलतंय तेवड्यात भसकन लायट आलो..मी झो गपकन मोरयेत गेलंय.. बादलेत पानी काढून ता भरता कदी ता बगीत  -हायलय..झो लायट परत जायची..
बादली भरली ..आणि झो लायट परत गेली ..जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा..
     धुमसतच चार तांबये अंगावर टाकले..आणि झो साबन रापित बसलय...खय गावना कूट...परत एकदा....जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा.....मग कसोबसो एक  गावलो...वायच वास जरा येगला वाटला..जल्ला सगल्या अंगास फासलय..तोंडाला लावनार तेवडयात भसकन मोरीतलो गुलोप पेटलो..हातातलो साबन बघितलो तर भांडी घासायचो विम बार.. जल्ला मेला करपटला कालीज ता ...वास  वायच बरा वाटला म्हणून झो सगल्या अंगास जोर काडून फासलेला ..तेवड्या साबनात लग्नाचे चार टॉप घासून झाले असते...
      ...भायर आलो..बायकोनं जेवायस वाडलेला..येव तशी मी नांदायला ....लागली व्हती..बगीत  बगीत जेवत व्हतो..झो तिकडं ओमचा आणि शिटूचा फिडर गेलेला आनी हित परत एमेशिबीचा फिडर गेला...परत येकदा.....जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा.....
       ताsss इचार केलंय आणि संतोस ला फोन लावलय..ह्यो संतोस पन भावकीतलो..एमेशिबित सायब हाय...
म्हतला  संतोस वायच जरा ही फिडरची  भानगड काय हाय रे..
त्यान बिचाऱ्यान सगला ईस्कटून सांगितलान...झो सगला डोक्यावरना गेला ..एवडाच कल्ला की फिडर गेला की लायट जाता...काय समजलाव.. 
       झोपताना परत भसकन लायट आली.. म्हतलं आता वायच सुकान झोप काडू... पन वलकटी वर आंग टेकला आनी झो..परत ..जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा.....
        रातभर डाशी मारत बसलय..सकाली बायको म्हनाली , अवो बुधवार हाय त्या मयाकडे जावा आणि चार कवटा घेवन या..मी झो उटलय आनी मयाकडे गेलंय.. ताsss मया दारातच दात घाशीत हुबा..म्हतला,मया चार कवटा दी.. तर म्हनतो कोंबडीन काल कवटाच घातल्यान नाय
म्हतल का रे बाबा..
तर म्हनतो फिडर गेला व्हता ना...
परत एकदा ..जल्ला मेला त्वांड ता एमेशिबिचा..
..
.
येताना इचार करत व्हतंय... फिडरचो आनि कोंबडीचो झो काय संबंद... कोंबड्याचो फिडर गेलो की एमिशीबिचो????

  झो मेंदूचा कवाट झालाय..

🤪🤪🤪🤪🤪🤪

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday 13 September 2021

सदाफुली...

का कोण जाणे मला सदाफुलीच विशेष कौतुक आहे. परिस्थिती कशीही असो पण सदैव हसत मुख असणाऱ्या माणसासारखी असते सदाफुली..गुलाबासारखे राजेपण ती कधीच मिरवत नाही..तिच्या वाट्याला चाफ्याची गूढता पण नाही आली कधी..बघा ना चाफ्यावर गाणी किती  झाली..पारिजातकाला दैवी अधिष्ठान लाभले...मोगरा तर थेट ज्ञानेश्वरीत जाऊन बसला..मोगरा फुलल्याचे कौतुक करायचा मोह अगदी ज्ञानेश्वरांनाही झाला..गुलाब तर गालावर देखील फुलतात..आणि अबोल अबोली न बोलता स्वतःला गजऱ्यात माळून घेते..चाफ्याची सख्खी ,चुलत भावंडे म्हणजे सोनचाफा,कवठी चाफा ही देखील वेळोवेळी भाव खाऊन जातात....पण बिचारी आपली सदाफुली..ऊन असो वा पाऊस, कुठेही बांधाच्या कडेला फुलत रहाते... तीला कोणी कुंडीत लावत नाही की तीच कोणाला कौतूक नसत..एरवी फडया निवडुंगाची फुलं स्वतःला ब्रह्मकमळ समजून घेऊन मालकाकडून अर्ध्या रात्री पूजा करून घेतात..पण सदाफुलीला देवपूजेत स्थान नसतं... का तर ती म्हणे फुलातील वेश्या..काय एकेक समजुती असतात ना...वेश्या जशा कायम सजलेल्या असतात तशी सदाफुली म्हणे कायम फुललेली असते..मग तिला फुलांतील कान्होपात्रा का म्हणू नये??
       परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल सदैव हसत राहणाऱ्या माणसाचे आपण किती तोंडभरून कौतुक करतो..मग एखादा शब्द ,एखादा गाणं व्हायला पाहिजे ना सदाफुलीसाठी..देवघरात नको पण एखादी कुंडी तरी असू देत ना तिच्यासाठी..बघा किती छान फुलेल ती...
       
       -प्रशांत शशिकांत शेलटकर
        03/09/2021
        8600583846

Friday 3 September 2021

सदाफुली

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...