Ad
Wednesday 29 March 2023
ग्रीष्म
Tuesday 21 March 2023
हे काय भलतेच..
आरशासमोर उभा मी
चक्क तू माझ्या जागी
कसले हे भास म्हणावे
प्रीत का उमलते मनी
हे वय नव्हेच प्रेमाचे
सांगतो मनाला पुन्हा पुन्हा
तरी का घडतो नकळे
प्रमाद हा पुन्हा पुन्हा
नावाचा तुझ्या, मनी रुजवा
नकळे कधी अवचित झाला
मन हे कानात सांगते माझ्या
ऋतू प्रेमाचा आला रे आला
चाललीस काट्यातून खूप तू
चाल आता माझ्या पावलांनी
अबोल गेली जिंदगी तुझी
बोल आता ग माझ्या स्वरांनी
न स्वप्न माझे भलतेच काही
नको लावूस अंदाज वेगळे
ठेवून लक्ष्य भलतेच काही
न करतो मी कौतुक सोहळे
आजवर नाहीच कळले मला
मी का उगाच मोहरून येतो
बोलताना तुझ्या सवे ग
शब्द शब्द कविता होतो
सूर लागता लागता भैरवीचे
का सर्व अवचित थांबले..
वाटते मैफिल कुठे सुरू झाली?
तानपुरे तर आत्ताच लागले..
असलीस जरी तू दूर देशी
खंत त्याची मुळीच नाही
प्रेम अनुपम तुझ्यावरती ग
बस्स नको मला दुसरे काही..
- प्रशांत शेलटकर ❤️
8600583846
Sunday 19 March 2023
राधा...
Saturday 18 March 2023
व्यक्ती स्वातंत्र्य
मागणे
Monday 13 March 2023
एक्झिट..
स्क्रिप्टेड लाईफ...
स्क्रिप्टेड लाईफ... कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...
-
तेव्हा माघार घ्यावी.... जेव्हा आपलंच माणूस अनोळखी होतं ... तेव्हा... शांतपणे माघार घ्यावी....... जेव्हा संपतात सारी नाती काही सकारणं....
-
" आपण आपल्या चॉईस प्रमाणे मुलाला जन्म देत नसून मुल आईवडील म्हणून आपल्याला निवडते..जन्म कुठे आणि कोणत्या कुटुंबात घ्यायचा हा पुनर्जन्मास...
-
मौन समाधी मौनाच्या तळ्याकाठी एक झाड अबोल अदृश्य शब्दहीन तरंग ते तळेही अबोल... त्या अबोल झाडाखाली कुणी बैसले अबोल झाडावरचा अनाम पक्षी सावरून ...