Ad

Thursday 22 February 2018

स्माईल प्लीज..यार

स्माईल प्लीज

वैशाख वणव्यात आणि अवसेच्या अंधारात
जेव्हा माझा मीच हरवून जातो ...
तेव्हा माझ्यातलाच  "तो " मला म्हणतो
स्माईल प्लीज यार स्माईल ...

वितभर पोटासाठी वणवण  भटकतो
जन्मजात प्रतिष्ठेसाठी कणकण झिजतो ...
स्वप्नांच्या दफन भूमीत जेव्हा मी मूकपणे रडतो ...
तेव्हा माझ्यातलाच  "तो " मला म्हणतो
स्माईल प्लीज यार स्माईल ...

रस्त्यातील भिकारी थाळी घेऊन फिरतो ..
दमडी दमडी साठी टाचा घासत मारतो
पदव्यांची भेंडोळी माझी थाळी असते
बॉस ची आश्वासने माझी दमडी असते
आमच्यातील साम्य जेव्हा मला रिकामी करते
तेव्हा माझ्यातलाच  "तो " मला म्हणतो
स्माईल प्लीज यार स्माईल ...

निष्पर्ण झाडावर हिरवं हिरवं पानूल येत
गर्भार जाणीवेने ते मोहरून जात
पहिल्या वहिल्या सृजनाला ...
झाड जीवापाड जपत ...
बर्फाळ शिशिराने ...पाहिलं पण गळून जात
वास्तवाच्या भयाण जाणीवेने ..
पहिल प्रेम जाळून जात
तेव्हा माझ्यातलाच  "तो " मला म्हणतो
स्माईल प्लीज यार स्माईल ...
            ---  प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...