Ad

Tuesday 6 February 2018

पुरुष

प्रत्येक पुरुषास समर्पित....

पुरुष

पुरुष...
भांडला तर रानटी आहे
गप्प बसला तर बिचारा आहे

पुरुष...
त्याला बिचारा म्हणणं पाप आहे...
बिनविषारी असला तरी तो शेवटी सापच आहे...

पुरुष....
कधी तो बायकोचा बैल आहे
कधी..
आईच्या पदराखालचं बाळ आहे...

पुरुष...
रडला तर बायल्या आहे...
नाही रडला तर दगड आहे

पुरुष...
कधी एटीम च मशीन आहे..
पैसा असला तरच हसीन आहे

पुरुष...
वाजला तर दादा बार आहे
नायतर लवंगीची माळआहे...

पुरुष....
साधा असला तर दादा आहे
स्मार्ट असला तर दादला आहे

पुरुष...
देतोय तोपर्यन्त देव आहे...
रिकामा झाला की दानव आहे

पुरुष...
जवानीत वाघाची छाती आहे
म्हातारपणी फक्त माती आहे

पुरुष...
असाही आहे तसाही आहे
पण कसाही असला तरी...
तो सगळ्याचा "बाप "आहे

-प्रशांत शेलटकर ©

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...