Ad

Saturday 27 July 2024

त्या तिथे पलीकडे..

त्या तिथे पलीकडे....

कल्पना या बुद्धीच्या अधीन असतात.बौद्धिक आकलनाच्या पलीकडे कल्पना जात नाहीत.एलियनला मानवसदृश्य चेहरा देणे हा माणसाच्या बौद्धिक  कक्षेचा परीघ आहे. परग्रहावरील मानव आपल्यासारखाच असेल,त्याला डोळे असतील ,कान असतील..तो ऑक्सिजन घेईल आणि कार्बनडाय ऑक्साईड सोडत असेल,त्याला पाण्याची गरज असेल आणि त्या हिशेबाने त्याचे अवयव असतील ही मानवी कल्पनेची झेप ,मानवी बुद्धी निश्चित करते.
    परग्रहावरील जीव मानव सदृश्यच असण्याची गरज नसते.मंगळावर पाण्याचे साठे असतील तरच तिथे जीवसृष्टी असू शकेल हे गृहीत देखील असेच संदिग्ध आहे. पाणी ही पृथ्वीवरच्या मानवाची गरज असते,परग्रही मानवाचे बॉडी स्ट्रक्चर वेगळे असू शकते त्याच बरोबर त्याच्या बेसिक रिक्वायरमेंट वेगळ्या असू शकतात.
     पण काहीतरी गृहीत धरल्या शिवाय विज्ञानदेखील पुढे जात नाही.एलियनला मानवी चेहरा दिला नाही तर त्याचे आकलन होणे कठीणच.जो कधी दिसला नाही,जाणवला नाही ,ज्याने त्याच्या अस्तित्वाची अनुभूती दिली नाही त्या एलियनचे चित्र तयार होते.त्याच्यावर चित्रपट येतात. म्हणजे माणूस कायम शास्त्र काटयाची कसोटी लावून जगू शकत नाही.तसा जगत राहिला तर बौद्धिक ताण येऊन तो एकतर वेडा होईल अथवा मरून जाईल. हाच ताण रिलीज करायला कल्पनेचा सेफ्टी व्हॉल्व दिलेला असतो. देव हा असाच एक सेफ्टी व्हॉल्व आहे.तो ताण रिलीज करतो.जो पर्यंत त्याला पर्याय येत नाही तोपर्यंत तो रहाणार. तो ही त्याच्या भल्या बुऱ्या परिणामांसकट...

  -© प्रशांत शेलटकर®

No comments:

Post a Comment

इथे पुन्हा जन्म नको..

इथे पुन्हा जन्म नको..  सत्कार सोहळा चालू असतो..स्टेजवर दांभिक माणसं बसलेली असतात..आपल्याला माहीत असतं की हे सगळे चोर आहेत..तरी देखील आपण हात...