Monday 25 September 2023

बेकाबू..

बेकाबू...

क्लास कडून मास कडे जाताना नेहमीच गुणवत्ता घसरत जाते..जसा आपला लोकसंग्रहाचा परीघ वाढत जातो तसे आपले टीकाकार वाढत जातात. क्लासचे मास मध्ये रूपांतर होताना तो एकतर उच्चकोटीचे विधायक होतो अन्यथा नीचकोटीचा विघातक होतो. गर्दीला तिचे म्हणून असे एक सामूहिक मन असते. गर्दीचा बुध्यांक कमी असतो..तर्कबुद्धी अत्यन्त मंद असते. तिचे नेतृत्व करणारा तिला स्वतःला हवे त्या दिशेला नेऊ शकतो .आपले विचार गर्दीवर प्रोजेक्ट करू शकतो.नेत्याच्या इच्छेप्रमाणे गर्दी वागते. म.गांधीच्या आवाहनाने हजारो सत्याग्रही तुरुंगात जात हे विधायक प्रोजेक्शन चे उदाहरण आहे तर दंगल हे विघातक प्रोजेक्शन आहे.
     सोशल मीडियावर देखील जसे जसे तुंमचे फ्रेंड सर्कल वाढत जाते तसे तसे कॉमेंट्सचा दर्जा घसरत जातो.अगदी    फ्रेंड सिलेक्शन पारखून केलं तरी एखादी पोस्ट नकळत कोणाला तरी हर्ट करते..पण तुम्ही जर सामाजिक ,धार्मिक आणि राजकारण या क्षेत्रात सहभागी असाल तर साहजिकच तुमची फ्रेंड लिस्ट मोठी असते.त्यामुळे भिन्न भिन्न मते असलेल्या लोकांच्या अगदी टोकाच्या कमेंट्स येतात.कारण धर्म आणि राजकारण या बद्दल लोकांची मते अगदी ठाम असतात.शॉर्टटर्मला ती बदलत नाहीत पण सततच्या प्रोजेक्शन मुळे ती लॉंगटर्मला बदलू शकतात..पोस्ट कर्ती जर स्त्री असेल तर काही वेळा अश्लील कॉमेंट्सपण येतात.माणसातले जनावर बाहेर येते. गर्दी बेफाम असते. तिला सद्सद्विवेक बुद्धी नसते. फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन मध्ये थोडी बंधने येतात पण व्हरच्युल कॉन्व्हर्सेशन मध्ये लोक मोकाट होतात. प्रत्यक्ष गर्दी एक नेता हँडल करत असतो पण व्हरच्युल गर्दी सगळेच नियंत्रित करायचा प्रयत्न करतात.त्यात मीच कसा बरोबर हे सिद्ध करायच्या प्रयत्नात माणसे घसरतात..स्वतःचे मत अत्यन्त प्रिय असल्याने त्याला कोणी क्रॉस केले की राग येतो.कारण मत म्हणजे स्वतःचे भावविश्व असते. ते आपण स्वतःला हवे तसे ,स्वतःच्या सोयीने,आणि स्वतःला अनुकूल असे बनवलेले असते आणि आपल्या मते ते आणि तेच सत्य असते..मग कोणी क्रॉस गेलं की आपल्या भावविश्वाला धक्का बसतो. राजकारण आणि धर्म या बाबतीत हे जास्त होते..

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment