Wednesday 2 June 2021

निरोप

निरोप...


कौतुकाचे चार शब्द, प्रेरणा देतात..निंदेचे चार शब्द आपले पाय जमिनीवर ठेवतात..आणि जर संवादच नसेल तर तो नसलेला संवादचं काहीतरी सांगत असतो..हा बिनशब्दांचा संवाद सांगत असतो चल तुझी निघायची वेळ झाली...आता बस्स कर
नाते निभावण्याचे ओझे दोन्ही खांद्यावर असेल तर ते सुसह्य असते पण ते एकाच खांद्यावर आले की असह्य होते.. चिडचिड होते.मग अशा नात्यांना फुलस्टॉप देणे गरजेचे असते..

एक सुंदर गाणं आहे...
चलो इक बार फिरसे 
अजनबी बन जाये हम दोनो...
असे अजनबी होणे प्रत्येक वेळी दुःखदच असावं असं काही नसते..एका खूबसुरत वळणावर एकमेकांना हसून बाय बाय करणे जास्त सुखद नाही का..?
     कुणाच्या पायाखाली काटे पसरून निरोप घेण्यापेक्षा, त्याची ओंजळ जगून गेलेल्या आनंदक्षणांनी भरून का टाकू नये..दुसऱ्याची ओंजळ फुलांनी भरता भरता आपली ओंजळ रिती झाली तरी ती सुगंधी तरी होतेच होते..या रित्या ओंजळीचे कौतुक जास्तच व्हायला हवे..तिला इदं न मम् म्हणण्याचे भाग्य लाभलेले असते..
     सगळेच निरोप दुःखद नसतात.. काही निरोप अडलेले प्रवाह मोकळे करणारे असतात..महान खेळाडू तो नव्हे जो अनेक विक्रम करतो..महान तोच जो कौतुक झेलत वेळेवर निवृत्त होतो...

अलविदा...💐

Have a nice day....💐

-प्रशांत शेलटकर
8600583846
03/06/2021

No comments:

Post a Comment