Saturday 24 April 2021

अर्धेमुर्धे..

डीजे दणदणत असतो, वरातीत आपले मित्र बेधुंद नाचत असतात. तसही त्यांना ते सरावाचे असते. डिजेचा 
-हिदम त्यांनी बरोबर पकडलेला असतो..सवाल फक्त आपला असतो..आपण जन्मजात लाजरे-बुजरे असतो. म्हणून आपण कडेला उभे असतो..
     अचानक एखादा मित्र खेचत ओढत वरातीत नाचायला नेतो.आपण कमालीचे ओशाळतो...काही केल्या तो हिदम आपल्याला पकडताच येत नाही. आपण कसेतरी हातपाय झाडत राहतो..सगळे मस्त एन्जॉय करत असतात.आपल्याला उगाच कॉम्प्लेक्स येतो..वरात संपते, डीजे थांबतो. आपले मित्र फुल्ल एन्जॉय करून दमलेले असतात.आपण वरात संपली म्हणून खुश...
    आयुष्यात असच होत काही वेळा..आपण अपघातानेच जन्माला आल्यासारख वाटत राहतं..आपले सूर आपल्याच आयुष्याशी जुळत नाहीत..सतत काहीतरी निसटून गेल्यासारख वाटत राहतं..आपण हातपाय मारत रहातो.. इतरांशी सूर जुळवत राहतो..पण कुठेतरी विसंगती राहून जाते.आपण मग त्या विसंगतीमधील संगती शोधण्याचा प्रयत्न करत राहतो..जिगसॉचे तुकडे जुळवत राहतो...पण ते जुळणारच नसतात ..त्यातला एक तुकडा मिस आहे ते कळतच नाही आपल्याला.. परफेक्शनचा ध्यास लागला की अर्ध्यामुर्ध्या चित्रातले आनंद पण दुर्मिळ होतात..
      तस पाहिले तर आपले हे अर्धेमुर्धे आयुष्य आपल्याला उमगत नाही हेच खरं

-प्रशांत शेलटकर
 8600583846
     

No comments:

Post a Comment