Thursday 9 May 2019

इदम न मम्

हे परमेशा..
एखाद्या प्रशांत क्षणी जागे होते तुझ्या-माझ्यातले जुनेच नाते..
मग वाटतं,
मोहाची वस्त्रे उतरवून ठेवावीत
अपेक्षांच्या काठावर...
आणि झोकून दयावे स्वतःला
तुझ्या करुणेच्या गंगौघात...

मग जन्मानुजन्मे लिपटलेली
वासनांची पुटे निघून जावीत
तुझ्या कैवल्य गंगेत...अन
स्फटिकागत झळाळून उठावी
तुझी माझी आदिम ओळख...
तत्वमसी ..तत्वमसी. तत्वमसी
तो तूच आहेस
तो तूच आहेस
तो तूच आहेस..

अन तुझंच तुला अर्ध्य देताना
अन स्वतःचाच विलय होताना
एकच अनाहत नाद गुंजावा..
इदम न मम्...
इदम न मम्...
इदम न मम्...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment