Saturday 29 December 2018

झिम्माड

अशी पावसात चिंब
भिजून ये सखे...
गात्रांत वीज अशी
पेरून ये सखी...

ढळलेला पदर तसाच
राहू दे ग सखी..
ओलेतीच ग तुला
पाहू दे ग सखी..

बट ओल्या गालावरची
राहूदे तशीच सखी...
आषाढ तुझ्या ओठांवरचा
ओठांनी या टिपू दे सखी..

वीज तुझ्या नजरेतली
खेळू दे ग सखी...
नक्षी तुझ्या देहाची
अशी पाहू दे सखी

तनुविणा तुझी अशी
झंकारु दे ग सखी
कंपने त्याची देही माझ्या
भिनू दे सखी..

हा मदिर पाऊस कधी
न थांबू दे सखी...
घन ओठांवर थांबलेला
चुंबू दे सखी...

ओले नि:श्वास तुझे
जाणवती इथे सखी
गालावर त्याची माझ्या
कित्येक फुले सखी...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8609583846/29/12/18

No comments:

Post a Comment