Saturday, 14 July 2018

विट्ठल

विठ्ठल ....मला उमजलेला...

सर्व देवतांची तुलना केल्यास विठ्ठल हे लोकप्रिय दैवत आहे निदान महाराष्ट्र व कर्नाटकात तरी...याचे कारण विठ्ठलाची गुणवैशिष्ट्य वेगळीच आहेत.
       समतोलाचे प्रतिक विठ्ठल..........
विठ्ठलाच्या मूर्तीचे निरीक्षण केल्यास मूर्ती प्रमाणबध्द आणि समतोल असल्याचे लक्षात येते. मूर्तीच्या शिरोबिंदूतून पायापर्यंत काल्पनिक रेषा काढल्यास ,रेषेच्या दोन्ही बाजूचा समतोल लक्षात येतो आयुष्य समतोल वृत्तीने जगा असा संदेश विठ्ठल आपल्याला देतो.
     भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा अठ्ठावीस युगे उभा आहे.यातून आपण इतकेच शिकायचे की परीस्थिती कशीही असो त्यावर मात करून संघर्ष करण्यासाठी ठामपणे उभे रहा.
     विठ्ठलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो निशस्त्र आहे . इतर देवांसारखे त्याने शस्त्र धारण केलेले नाही . कारण विठोबा सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रतिक आहे. कष्टकरी शेतक-याला तो आपला वाटतो याचे कारण विठ्ठलाचे साधे आणि सात्विक रूप....
      लक्षावधी वारक-यांचे भागधेय असलेला विठठल महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा जनकच म्हणायला हवा. भक्तीला जातीभेदाच्या पलीकडे जाऊन मानवी चेहरा देण्याचे काम ज्या वारकरी संप्रदायाने केले त्या वारकरी संप्रदायाचे सर्वस्व म्हणजे विठ्ठल...

आषाढीच्या विठ्ठलमय शुभेच्छा

🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
       ---प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment