Ad

Monday 8 July 2024

आई

आई..

आईला जपा रे
ती गेली की 
केवळ हुंदक्यात
उरते ती..
ती गेली की
हसण्याचा केवळ
अभिनय करावा लागतो..
जगरहाटी म्हणून
करत रहातो आपले 
दैनंदिन व्यवहार
पण मायेची नाळ 
तुटल्याचा सल
कायम राहतो..
सलत मनात..
म्हणून आईला जपा रे

वय झालय तीच..
तुम्हाला वाढवता वाढवता
तीचंच एक लहान मूल झालय
तुम्हाला मोठं करता करता
ती चिडचिड करते
ती रागवते..
विस्मरण होत तिला हल्ली
पण तुम्ही चिडचीड करू नका रे
ती एकदा गेली की
परत येत नसते रे
म्हणून आईला जपा रे

तिची वेळ आली
की ती जाईलच..
सरणावरचे पार्थिव
जळतच राहील.
तेव्हा तुम्हाला उमजेल
ती आयुष्यभर जळत होती
तुमच्यासाठी केवळ
केवळ तुमच्या साठी
मग कितीही रडलात
तरी ती परत येत नसते रे..
म्हणून ती असते तो पर्यंत
आईला जपा रे...

प्रशांत शशिकलाकांत

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...