Saturday 29 January 2022

सूनबाईंसाठी टिप्स

सूनबाईंसाठी टिप्स...

1. मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा नवीन माणसे आणि वातावरण यांच्याशी जुळवून घेणे कठीण असते.म्हणून लग्न ठरवताना  मुलगा किती कमावतो हे पाहताना त्याचा आणि त्यांच्या घरच्यांचा स्वभाव कसा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

2. लग्नापूर्वीच सासू ही त्रास देणार छळ करणार असे गृहीत धरू नये. मनाची पाटी कोरी करून सासरी प्रवेश केल्यास अडजेस्ट होणे सोपे जाते

3 सासरी सर्वांचे मन जिंकण्याच्या नादात स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेऊ नये. न पटलेली गोष्ट शांतपणे ,आणि ठामपणे का करणार नाही ते स्पष्ट शब्दात सांगावे.चेहरा हसरा ठेवूनही नकार देता येतो. न पटणाऱ्या गोष्टी करत गेल्यास मनातल्या घुसमट होते आणि तीच पुढे कौंटूंबिक कलहाला आमंत्रण देते.

4.पूर्वग्रह ठेऊन सासुकडे पाहिलं तर सासू म्हणजे त्रास वाटू शकतो. अपवादात्मक सासवा सुनेला मुलगी मानतात. म्हणून सासु मध्ये आई पाहू नये आणि आईची तुलना सासूबाईंशी करू नये

5. सासूबाईंना किचन मधून बेदखल करू नये. तिने काडी काडी जमवून संसार उभा केलेला असतो त्याचा मोह लगेचंच जाईल असे नाही. उलट त्यांच्या मनात मुलाच्या मनातील आईचे महत्व कमी होईल याची भीती वाटत असते.

6. आपला नवरा हा कुणाचा तरी मुलगा आहे हे लक्षात ठेवावे.त्याच्यावर प्रेम करा पण आई हे त्याचे पाहिले प्रेम आहे हे लक्षात ठेवा..

7.जेवणाचे मेनू ठरवताना सर्वांची आवड लक्षात घेऊन मेनू ठरवा. स्वयंपाक करताना नवरा आणि मुलांना पण सहभागी करून घ्या.

8. जे काही बोलायचं असेल ते स्पष्ट आणि नम्र भाषेत सांगा. पण टोमणे चुकूनही मारू नका

9. कितीही जवळची असली तरी मुलीच्या आईचा मुलीच्या संसारात हस्तक्षेप असू नये. सासू म्हणजे शत्रूपक्ष नाही.

10 संसारात काही समस्या उदभवल्यास त्याचे सोल्यूशन माहेरी शोधू नये. स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवा.

नवरोबां साठी  टिप्स लवकर लिहितोय....

प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment