Ad

Sunday 2 September 2018

आयुष्याची प्रश्नपत्रिका

आयुष्याची प्रश्नपत्रिका...
सर्वांनाचसोडवायची असते...
प्रत्येकाची असते वेगळी
म्हणून कॉपीची सोय नसते

काही प्रश्न असतात सोपे
अन काही असतात अवघड
सर्वच प्रश्न सुटलेच पाहिजे
अशी नसावी धडपड...
कधी कधी अवघड प्रश्नांना
ऑपशनला टाकायचे असते
आयुष्याची प्रश्नपत्रिका...
सर्वांनाच सोडवायची असते...
प्रत्येकाची असते वेगळी
म्हणून कॉपीची सोय नसते

इथे जुळतात विजोड जोड्या
उत्तरांना कधी नसतात पर्याय
कधी गाळांतरे तशीच राहतात.
त्याला नसतो कसलाच उपाय
सुटला नाही प्रश्न म्हणून कधी
निराश व्हायचेच नसते...
आयुष्याची प्रश्नपत्रिका...
सर्वांनाच सोडवायची असते...
प्रत्येकाची असते वेगळी
म्हणून कॉपीची सोय नसते

इथे दोन अधिक दोन
चार असतीलच असं नाही
दुःखाला भागले सुखाने तर
बाकी काही रहातच नाही..
इथे आपल्या वाट्याचे गणित
आपणच सोडवायचे असते
आयुष्याची प्रश्नपत्रिका...
सर्वांनाच सोडवायची असते...
प्रत्येकाची असते वेगळी
म्हणून कॉपीची सोय नसते

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...