Ad

Monday 10 September 2018

जातींसाठी छाती फुगवणे आता तरी सोडून द्या...

पृथ्वीराज चौहान शूर होता
जयचंद राठोडही शूर होता
होळकर  शिंदे शूर होते
पेशवे  आंन्ग्रेही शूर होते

नागपूरचे भोसलेही शूर होते
सातारचे भोसलेही शूर होते
करवीरचे भोसलेही शूर होते
देवगिरीचे राजेही शूर होते

राजस्थानी रजपुतही शूर होते
विजयनगर सम्राटही शूर होते
मग असे काय घडले की
परकीयांनी आम्हा गुलाम केले

आम्ही आपसात लढत राहिलो
आपआपसात भांडत राहिलो
जातीपातीच्या  बेटकुळ्या
एकमेकांना दाखवत राहिलो

मी कसा खानदानी आहे
तू किती हलका आहे....
खोट्या इतिहासातले
खोटे पुरावे दाखवत राहिलो

आज तरी काय करतो
जातींसाठी मोर्चे काढतो
आधीच फुटलेले आपण
आणखीनच फुटत जातो

जो इतिहास विसरतो
तो इतिहास घडवत नाही
भूतकाळ सोडल्याशिवाय
भविष्य आकारास येत नाही

आता एक करा भावांनो
जातीचा गर्व सोडून द्या
जातींसाठी छाती फुगवणे
आता तरी सोडून द्या...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...